गली बॉय रणवीर सिंह लवकरच करणार मोठा धमाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

बाजीराव मस्तानी, पद्मावत, सिम्बा आणि गली बॉय सारखा सुपर डुपर चित्रपट देणारा रणवीर सिंह लवकरच अजून एका मोठ्या चित्रपटात झळकणार आहे. फिल्ममेकर राजकुमार संतोषी ‘अदांज अपना अपना’ या चित्रपटाचा सिक्वेल बनवणार असून त्यात महत्वाच्या भूमिकेत रणवीर दिसणार आहे. हा चित्रपट सुपर डुपर होईल असा विश्वास राजकुमार संतोषी यांनी व्यक्त केला आहे.

राजकुमार संतोषी यांच्या या सिक्वेलमध्ये दोन अभिनेत्री असणार आहेत. त्यासाठी संतोषी नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे. एखाद्या स्टार किड्सची वर्णी या चित्रपटात लागण्याची शक्यता आहे.  रणवीरने देखिल नवीन चेहरा घेण्याबद्दल संतोषी यांना सांगितल्याचे कळते. तसेच रणवीर याही चित्रपटात धमाकेदार काम करेल अशी त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर रणवीरणेही एका टि्वटमध्ये अप्रत्यक्षपणे या चित्रपटाबद्दल संकेत दिले आहेत.