बार सिंगरच्या घरी चोरी करणारा ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बार सिंगरच्या घरी चोरी करणाऱ्याला साकीनाका पोलिसांनी अटक केली. मजहर अहमद अन्सारी असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 26 लाख 95 हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले आहे.

तक्रारदार या बार सिंगर असून त्या साकीनाका येथे राहतात. मजहर हा तिच्याकडे येत असायचा. बार सिंगरमधून मिळणाऱ्या पैशांतून तिने काही सोन्याचे आणि चांदीचे दागिने खरेदी केले होते. पैसे आणि दागिने असलेली बॅग फ्रीजच्या बाजूला ठेवली होती. ते पैसे आणि दागिने घेऊन त्या गावी जाणार होत्या. याबाबत त्याने मजहरला सांगितले होते. तसेच घराची एक चावी ही मजहरकडे असायची. गेल्या आठवड्यात रात्री त्या घरी आल्या. तेव्हा घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटला. त्याला घरात दागिने आणि पैसे असलेली बॅग मिळून आली नाही.

तक्रारदार यांनी मजहरला पह्न केला. त्याचा पह्न बंद येत होता. घडल्याप्रकरणी त्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. साकीनाका पोलिसांनी मजहरविरोधात गुहा नोंद केला. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. उपनिरीक्षक सुहास कांदे, गांजाळे, पवार, भिंगावडे, राठोड, साळुंखे, महाजन, पिसाळ आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. मजहरने विमान तिकीट बुकिंगसाठी दुसऱ्या नंबरचा वापर केला होता. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. तसेच त्याने मुंबई ते जयपूर असा विमान प्रवास केला. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने मोबाईल हा अजमेर येथे चालू ठेवला. पोलिसांनी त्याला अटक केली.