
सामना ऑनलाईन। मुंबई
‘सपना बाबुल का- बिदाई’ या टीव्ही मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सारा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण ही चर्चा तिच्या नव्या शो बद्दल नसून तिच्या लिप सर्जरीबद्दल आहे. तिने केलेली लिप सर्जरी तिला शोभत नसल्याने नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. पण यावर लिप सर्जरी बरोबर झाली असून ती मला शोभत असल्याचं खरमरीत उत्तर देत साराने नेटकऱ्यांना गप्पं केलयं.
सारा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. यामुळे तिच्या प्रत्येक फोटो व पोस्टवर नेटकऱ्यांच लक्ष असतं. काही दिवसांपूर्वीच तिने तिचे काही बोल्ड फोटो पोस्ट केले होते. त्याबरोबरच तिचा नवीन अल्बम येत असल्याचंही तिने सांगितले होते. पण त्या अल्बममधील गाण्यापेक्षा चर्चा झाली साराच्या चेहऱ्याची व ओठांची. कारण यात तिने लिप सर्जरी केलेली स्पष्ट दिसत होती. पण सर्जरी केल्यानंतर सारा सुंदर दिसण्याऐवजी विचित्र दिसत होती. यामुळे तिला नेटकऱ्यांनी सर्जरी चुकीची झाल्याचे सांगितले. पण साराने न रागावता न चिडता आपल्याच स्टाईलमध्ये त्यांना उत्तर दिले. ती म्हणाली माझी लिप सर्जरी बरोबर झाली असून माझा चेहरा बघून मी तर फारच खुश आहे. पण तरीही मी लोकांना सांगते की मी लिप फ्रिलरचा उपयोग करते. ती काही सर्जरी नाहीये. साराचे हे उत्तर ऐकून नंतर नेटकरीही शांत झाले.



























































