
सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिकेच्या 29 उद्यानांमध्ये असणाऱया खुल्या नाटय़गृहांमध्ये (ओपन थिएटर) आज सकाळी गुलाबी थंडीत संगीत सभांचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या उद्यान खात्याच्या पुढाकाराने आणि ‘बनयान ट्री’ व ‘टेंडर रुटस् ऍकॅडमी’ या संस्थांच्या सहकार्याने सकाळी 7 ते 9 दरम्यान आयोजित संगीत सभांमध्ये 75 पेक्षा अधिक उदयोन्मुख संगीत साधकांनी हिंदुस्थानी शास्त्राrय संगीताचे विविध पैलू उलगडून दाखवित व आपली कला सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. मुंबईकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘मुंबई ग्रीन रागा’ या शीर्षकांतर्गत आज आयोजित करण्यात आलेल्या या संगीत कला अविष्करणात गायनासह सारंगी, बासरी, तबला, संवादिनी, सितार, सरोद, संतूर यासारख्या विविध वाद्यांचे वादनदेखील करण्यात आले. पालिकेच्या 29 उद्यानांमध्ये खुली वर्तुळाकार नाटय़गृहे (ऍम्फी थिएटर) आहेत, तर अनेक ठिकाणी खुले मंचदेखील आहेत. यापैकी 17 उद्यानांमध्ये आज सकाळी 7 वाजता संगीत सभांचे आयोजन करण्यात आले होते. ब्रीच कॅण्डी टाटा उद्यान, माझगावचे बाप्टिस्टा उद्यान, शिवाजी पार्कजवळचे बाजीप्रभू उद्यान, वांद्रे किल्ल्याजवळील जॉगर्स पार्क, रावसाहेब पटवर्धन उद्यान, लायन्स जुहू पालिका उद्यान, मालाडचे वीर सावरकर मैदान, जोगेश्वरीचे मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम अशा 17 उद्यानांत कार्यक्रम झाला.



























































