मुरलीधरनचा हिंदुस्थानात व्यवसाय

कर्नाटकमध्ये सुरू करतोय एनर्जी ड्रिंकच्या पॅन निर्मिताचा कारखाना

फिरकीच्या जोरावर भल्याभल्या फलंदाजांना भंबेरी उडवणाऱया श्रीलंकेचा विश्वविक्रमी फिरकीवीर मुथैया मुरलीधरन चक्क बिझनेसमन बनलाय, तेसुद्धा हिंदुस्थानात. तो कर्नाटकातील धारवाड जिह्यामध्ये मुम्मीगट्टी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये तो एनर्जी ड्रिंकसाठी आवश्यक असणाऱया अॅल्युमिनियमचे पॅन बनविण्याचा कारखाना सुरू करत आहे. या व्यवसायात त्याने 100 कोटींची गुंतवणूक केली असून स्थानिकांना रोजगाराच्या शेकडो संधी उपलब्ध होणार आहेत.
या प्रकल्पाची जागादेखील निश्चित केली असून पहिल्या टप्यात 256 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. विविध आकारातील सात अॅल्युमिनियम पॅन तयार करण्यात येणार आहेत.