हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शॉर्टकटने कोणताही देश चालू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी स्थायी विकास आणि दूरचा विचार गरजेचा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. हिंदुस्थान पुढील 25 वर्षांचे धोरण समोर ठेवून काम करत असताना काही पक्ष आपल्या स्वार्थासाठी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शॉर्टकट पक्षांपासून दूर रहा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यासोबत जवळपास 75 हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही मोदींनी केले. देशातील करदात्यांचे पैसे लुटायचे आणि आपला स्वार्थ साधायचा हे लक्ष्य ठेवणारे पक्षच देशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. आमदनी अठन्नी, खर्चा रुपया करणारे राजकीय पक्ष अर्थव्यवस्थेसाठी घातक आहेत. देशाला अशा वाईट नीतीपासून वाचवले पाहिजे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, शॉर्टकट घेणारे हे राजकीय पक्ष प्रत्येक करदात्याचे शत्रू आहेत. सत्तेत येणे हाच यांचा हेतू असतो. खोटी आश्वासने देऊन सरकार हिसकावून घेण्याचा हेतू असणारे कधीही देश निर्माण करू शकत नाहीत. देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी भविष्याचा विचार होणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.

देशात पहिली औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आपण फायदा घेऊ शकलो नाही. दुसऱया आणि तिसऱया वेळीही आपण मागे होतो. मात्र आज देशात चौथ्या औद्योगिक क्रांतीची वेळ आली आहे. तेव्हा हिंदुस्थान ती संधी गमावू शकत नाही, असे मोदी म्हणाले.यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, पेंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी नागपूर मेट्रो फेज 1 राष्ट्राला समर्पित केला आणि फेज 2 ची पायाभरणीही केली. यावेळी पंतप्रधानांनी मेट्रोतून प्रवासही केला आणि सहप्रवासी, विद्यार्थी यांच्याशी संवादही साधला.
पंतप्रधानांनी नागपूर-विलासपूर दरम्यान धावणाऱया ‘वंदे भारत’ एक्सप्रेस या गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. ही देशातील सहावी, तर महाराष्ट्रातील दुसरी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आहे.
नागपूर एम्स रुग्णालयाचेही मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले.