नालसार विद्यापीठ वाद; बार काऊंसिलच्या अध्यक्षांचा माफीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबाद येथील नालसार विधि विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासंदर्भातील वादाबाबत सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी फटकारल्यानंतर बार काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन पुमार मिश्रा यांनी लेखी माफी मागितली आहे. मिश्रा यांनी स्वातंत्र्य दिनी एक पत्र जारी केले असून त्यांनी त्यात विधि विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे.

नालसारच्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर बार काऊंसिलने नालसारच्या वर्ष 2026च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी रोखण्याचे आदेश दिले होते. मात्र, यावरून सरन्यायाधीशांनी बार काऊंसिलला फटकारले होते. त्यानंतर मिश्रा यांनी माफीनामा जारी केला. त्यांनी नालसारचे नाव घेतले नाही तसेच नेमक्या वादावरही भाष्य करणे टाळले. मात्र, त्यांनी अलीकडच्या काळातील घटनाक्रम असा उल्लेख करत तरुण विद्यार्थ्यांची माफी मागितली.