दोन विद्यार्थिनींचा धरणात बुडून मृत्यू, यवतमाळच्या बोरगावमधील दुर्घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळी पर्यटनाचा आनंद यवतमाळमधील दोन कुटुंबांसाठी आयुष्यभराचे दुःखाश्रू ठरला आहे. निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी बोरगाव धरणावर गेलेल्या दोन तरुण विद्यार्थिनींचा धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू झाला. पाण्यात घसरलेल्या मैत्रिणीला वाचवण्याच्या धाडशी, पण दुर्दैवी प्रयत्नात दुसऱ्या विद्यार्थिनीलाही आपला प्राण गमवावा लागला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडली.

अमृता खेडकर (20) आणि मोहिनी गौत्रे (20) अशी या मृत विद्यार्थिनींची नावे आहेत. दोन्ही तरुणी यवतमाळ येथील वाधवानी फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दोघी आपल्या काही वर्गमित्रांसोबत यवतमाळनजीकच्या बोरगाव धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या.

युवकाचे अपयशी प्रयत्न

त्यांच्यासोबत आलेल्या एका युवकाने प्रसंगावधान राखून तातडीने पाण्यात उडी घेतली. त्याने दोघींपर्यंत पोहोचून त्यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पाण्याचा अथांग तळ आणि दोघींचे वजन यांमुळे त्या युवकाचे प्रयत्न अपुरे पडले. स्वतःचा जीव वाचवत अखेर त्याला हतबल होऊन काठावर परतावे लागले.