
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ट अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. नाना पाटेकर यांच्या पार्थिव शरीरावर त्यांचे आवडते ठिकाण म्हणजेच पुण्यातील त्यांच्या फार्महाऊसजवळील शेतात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. गुरुवारी संध्याकाळी चार वाजता नानांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला जाणार आहे.
नाना पाटेकर यांचे पुण्यातील भोर तालुक्यात सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात एक फार्महाऊस आहे. त्या फार्महाऊसला त्यांनी ‘नानाची वाडी’ असं नाव दिलेलं आहे. हे फार्महाऊस नाना पाटेकरांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक होतं. त्याच ठिकाणी नाना पाटेकर यांना आज अखेरचा निरोप दिला जाणार आहे.
तब्बल २७ एकर परिसरात पसरलेल्या या फार्महाऊसवर नाना पाटेकर शेतीही करायचे. त्यांच्या फार्महाऊसवर गायी आणि म्हशीदेखील होत्या.

























































