
सामना ऑनलाईन । नांदेड
नांदेडमध्ये एका युवकाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हिदायद यूनुस असे या तरुणाचे नाव असून त्याने अंगावर पेट्रोल टाकत स्वतःला पेटवले. यात हिदायद यूनुस हा 30 टक्के भाजला आहे. यूनुस याच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचा थरार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हिदायद हा काही दिवसांपूर्वी ‘फ्रेंड्स जर्दा स्टोर्स’ येथे कामाला होता. त्याच दुकान मालकाकडे त्याने मदत म्हणून पैसे मागितले होते. मात्र मालक पैसे देत नसल्याचे पाहून यूनुसने अंगावर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेतले. 31 डिसेंबरच्या रात्री नांदेडच्या जूना मोंढा भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी नांदेड पोलीस अधिक तपास करत आहेत.



























































