खरातला 9 मेपर्यंत पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nashik-crime-news-kharat-sent-to-police-custody-till-may-9-fraud-case

जमीन व्यवहारात फसवणूकप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अटक केलेल्या भोंदू अशोक खरात याला राहता न्यायालयाने 9 मेपर्यंत पोलीस कोठडी दिली.

शिर्डी येथील रावसाहेब गोंदकर यांना खरात याने साडेपाच कोटी रुपये व्याजाने दिले, त्याबदल्यात त्यांची शेतजमीन लिहून घेतली. एक वर्षानंतर जमीन देण्यास नकार देऊन ती बळकावली. याप्रकरणी खरात व पत्नी कल्पना या दोघांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

एसआयटी तपास करीत असलेल्या नाशिकमधील नवव्या गुह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सोमवारी, 4 मे रोजी त्याला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी राहता न्यायालयात हजर केले असता त्याला 9 मेपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली.

या गुह्यात खरातची पत्नी कल्पना फरार असून, न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.