राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा आजपासून; प्रणिता सोमण महाराष्ट्राची कर्णधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणा येथे 25 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत होत असलेल्या 26 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय पदकविजेती सायकलपटू प्रणिता सोमण हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवड समिती अध्यक्ष प्रताप जाधव आणि संघटनेचे सचिव प्राध्यापक संजय साठे, खजिनदार भिकन अंबे यांनी जाहीर केला. मार्चमध्ये पनवेल येथे झालेल्या 25 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले होते.

महाराष्ट्राचा संघ – महिला – प्रणिता सोमण (नगर – संघ कर्णधार), रंजिता घोरपडे, मनवी पाटील                           (दोघी कोल्हापूर),  प्रियंका कारंडे (सांगली), श्राव्या यादव (संभाजीनगर).

महिला ज्युनियर – पूजा दानोले (कोल्हापूर), आदिती डोंगरे (पुणे क्रीडा प्रबोधिनी), संज्ञा कोकाटे                        (मुंबई), मनाली रत्नोजी, श्वेता गुंजाळ (दोघी पुणे).

मुख्य प्रशिक्षक – राजेंद्र सोनी. प्रशिक्षक – बिरू भोजने. सह प्रशिक्षक व व्यवस्थापक – पांडुरंग भोजने, मेपॅनिक.व्यवस्थापक – केशव शिंदे.