गंभीर गुन्ह्यातील नक्षलवादी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन पोलीस जवानांसह आठ निष्पाप लोकांची हत्या, दरोडे आदी गंभीर गुन्हे करणाऱया एका नक्षलवाद्याला आज गडचिरोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रस्तावित खाणी व रस्त्यांना विरोध करत तोडगट्टा येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या स्थळापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील छत्तीसगड सीमेवरील हाचबोडी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवून ही कारवाई करण्यात आली.

साधू ऊर्फ काल्या ऊर्फ संजय नरोटे (31) असे त्या नक्षलवाद्याचे नाव आहे. या अभियानादरम्यान आज गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गट्टा पोलीस मदत पेंद्र हद्दीतील हाचबोडी जंगल परिसरात साधू नरोटे याच्या मुसक्या आवळल्या.