Lok Sabha 2019 ईव्हीएमच्या प्रात्यक्षिकावेळी सावध राहा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - संदिप पागडे

सामना ऑनलाईन, मुंबई

भाजपवर विश्वास ठेवता येणार नाही. निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर सकाळी लवकर जाऊन ईव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखवताना सावध राहा. ते नीट चालते की, नाही त्याची खात्री करा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुथ कार्यकर्त्यांना केली आहे. बीडमधील पक्ष कार्यकर्त्यांनी पवार यांनी व्हिडिओ कान्फरसिंगद्वारे संवाद साधला. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक करता येत नाही. त्याचा दुरुपयोग होणार नाही, याची शाश्वती दिली आहे. मात्र, त्यावर विरोधी पक्षांनी अविश्वास दाखवत ईव्हीएमऐवजी बॅलेट पद्धतीनेच मतदान घ्यावे, अशी आग्रही मागणी केली आहे.