
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱया आयर्लंड संघाला न्यूझीलंडच्या नताशा कोडीरे आणि टॅश वेकलीन यांनी अचूक मारा करीत 74 धावांतच गुंडाळले. आयर्लंडकडून ऍबी हॅरिसन (14) आणि झारा क्रेग (20) यांनीच दोन अंकी धावसंख्या गाठली. त्यानंतर न्यूझीलंडने पाऊणशतकी लक्ष्य 6.5 षटकांत अवघा एक विकेट गमावत गाठले. ऍना ब्राऊनिंगने 14 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकत 29 धावा केल्या तर ऍण्टोनिया हॅमिल्टन (18) आणि जॉर्जिया प्लिमर (17) यांनी नाबाद खेळ करीत संघाच्या विजयावर सातव्या षटकांतच शिक्कामोर्तब केले.
रवांडा जोरदार
रवांडा महिला संघाने मार्विल उवास (18), सिंथिया तुईझेर (30) आणि जिसेल इशिमवे (34) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 20 षटकांत 8 बाद 119 धावा काढल्या होत्या. हेनरिट इशिमवेच्या अफलातून गोलंदाजीमुळे रवांडाने झिम्बाब्वेचा 18.4 षटकांत 80 धावांत खुर्दा पाडला. हेनरिटने 13 धावांत 4 विकेट टिपल्यामुळे रवांडा स्पर्धेतील पहिला विजय नोंदविता आला.



























































