इस्त्रायली सैन्याची जेनीन भागात कारवाई, चकमकीत 9 पॅलेस्टिनी ठार

पॅलेस्टिनमधील वेस्ट बँक परिसरात इस्त्रायली लष्कराच्या हल्ल्यात नऊ पॅलेस्टिनी ठार झाले असून त्यात एका वयोवृद्ध महिलेचा समावेश आहे. यावर प्रतिक्रिया देताना इस्त्रायली लष्कराने सांगितले की हा त्यांच्या कारवाईची एक भाग होता. पॅलेस्टिनी सैन्याने काही इस्लामी जिहादींना आश्रय दिल्यामुळे हि कारवाई त्यांना करावी लागली.

पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने मृत आणि जखमी व्यक्तींचा आकडा सांगितला आहे. तीनजणांच्या मृत्यूबरोबर वीसजण गंभीर जखमी झाले आहेत. इस्त्रायल लष्कराने दावा केला आहे की आम्ही जिहादींना अटक करण्यासाठी आलो असताना त्यांच्या आणि आमच्या चकमकीत सामान्य माणसेही भरडली गेली. हे अपरिहार्य होते. आम्ही जेव्हा जीनेन शहरात शिरलो तेव्हा पॅलेस्टिनीकडून आमच्यावर गोळीबार सुरु झाला. तीन जिहादी परिसरातील इमारतीत लपून बसले आणि चौथा आमच्या स्वाधीन झाला. पॅलेस्टिनी आणि जिहादींच्या दाव्यानुसार इस्त्रायल सैन्याकडून सातत्याने गोळीबार आणि हल्ल्यासाठी अत्याधुनिक हत्यारांचा वापर गेला. माध्यमांच्या सांगण्यानुसार वफा या न्युज एजन्सीने सांगितले की या हल्ल्याचा प्रतिकार करताना सात तरुण जखमी असून त्यांची स्थिती गंभीर आहे. शिवाय यात जेनीन क्लब पूर्णत: उध्वस्त झाला आहे.

मोहोम्मद अम्मोरी हा टक्सी ड्रायव्हर या हल्ल्याचा प्रत्यक्षदर्शी आहे. त्याने सांगितले की इस्त्रायली लष्कर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हल्ला करीत होते. आम्ही जेनीन क्लबच्या तळघरात चार तास लपून बसलो होतो. हल्ल्यानंतर तासाभराने लष्कराच्या बुलडोझरने रस्त्यावरील असंख्य गाड्या उध्वस्त केल्या. याला प्रतिकार म्हणून पॅलेस्टिनी तरुणांनी दगडफेक केली.

पॅलेस्टिनी आरोग्यमंत्र्यांनी असा दावा केला आहे की या भागात जखमींसाठी आमच्या अम्ब्युलन्सही पोहोचू शकल्या नाहीत. शिवाय इस्त्रायलने जेनीनमधील एका रुग्णालयातील लहान मुलांच्या विभागावर हल्ला केला आहे. या एकूण हल्ल्यात एकूण २९ नागरिक ठार झाले आहेत. इस्त्रायल पश्चिम किनारपट्टी भागातून स्थानिक नागरिकांची हकालपट्टी करण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे दोन्ही देशांच्या संघर्षात वाढ झाली आहे.