नीतेश राणेंना जामीन मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी 30 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर करताना काही अटीही घातल्या आहेत.

आठवड्यातून एक दिवस सकाळी 10 ते 12 या वेळेत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात न येणे आणि पोलीस जेव्हा तपासकामासाठी बोलावतील तेव्हा हजर राहणे या अटी न्यायालयाने त्यांना घातल्या आहेत.