खड्डे कुठेही असो दोष मलाच देतात – नितीन गडकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य महामार्गावरील खड्डे असो की मिसिंग लिंकशी संबंधित काही समस्या याचा दोष देत मलाच सोशल मीडियावर ट्रोल केले जाते, अशी खंत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित ‘विचारवंत महोत्सव’ व्याख्यानमालेत बोलताना गडकरी यांनी ही खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘27 वर्षांपूर्वी मी मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग तयार केला. आजवर या महामार्गावर एकही खड्डा पडला नाही, महामार्ग उत्तम स्थितीत आहे. पण, याबाबत कधीही बातमी प्रसिद्ध होत नाही.’

मिसिंग लिंकवर पडलेल्या खड्डय़ांचा संदर्भ देत गडकरी म्हणाले, ‘माझ्या कार्यकाळात वन विभागाने याला परवानगी दिली नाही. त्यामुळे मला मिसिंग लिंक उभारता आली नाही. आता राज्य सरकारने मिसिंग लिंक उभारली आहे. पण, याच्याशी निगडित समस्या समोर आल्या तेव्हा माझ्यावरच टीका करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने उभारलेला प्रकल्प असला, तरी सोशल मीडियातून मलाच लक्ष्य केले जाते