Vidarbha स्वतंत्र विदर्भाची गरजच नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नागपूर

विदर्भ समृद्ध, संपन्न व्हावा म्हणून वेगळय़ा विदर्भाची मागणी होत होती, पण आता विदर्भाचा झपाटय़ाने, चौफेर विकास होत आहे. त्यामुळे वेगळय़ा विदर्भाची गरज नाही असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष केले.  नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरात आज नागपूरच्या 18 विकासकामाचे भूमिपूजन गडकरी व फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात तीन-चार विदर्भवादी युवकांनी वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशा घोषणा देत पत्रके फेकली. गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गडकरी यांनी विदर्भवाद्यांना आपल्या शैलीत दम दिला.