कामगार कपातप्रकरणी अॅमेझॉनला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वेच्छानिवृत्तीच्या नावाखाली कर्मचाऱयांना कामावरून काढलं जात असल्याच्या तक्रारीवरून पुण्यातील कामगार आयुक्तांनी अॅमेझॉन कंपनीला नोटीस काढली आहे. 17 जानेवारी रोजी कंपनीला म्हणणे मांडण्यासाठी कामगार आयुक्तांकडे हजर राहण्यास सांगितले आहे.

नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेट या संस्थेच्या वतीने अॅमेझॉनविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे.