Nykaa Ipo चे गुंतवणूकदारांकडून दणदणीत स्वागत, पदार्पणातच 1 लाख कोटींच्या मार्केट कॅपचा टप्पा ओलांडला

शेअर बाजारात बुधवारी पडझडीचं वातावरण होतं. सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांनी पडला असला शेअर मार्केटमध्ये पदार्पण करणाऱ्या नायका Nykaa च्या समभागाने दणदणीत सुरूवात केली आहे. FSN E-Commerce Ventures Ltd नावाने ही Nykaa चे शेअर हे बाजारात आले असून बीएसईमध्ये हे शेअर्स 78 टक्के प्रिमिअमसह 2001 वर लिस्ट झाले आहेत. दिवसभरात हा शेअर 2218 रुपयांचा टप्पा गाठून आला.

लिस्टिंगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये एका शेअरची किंमत ही 1885 इतकी होती जी मूळ आयपीओमध्ये नमूद केलेल्या प्रति शेअरच्या किमान किंमतीपेक्षा 68 टक्के जास्त होती. यावरून लिस्टींगनंतर या शेअरच्या किंमतीत जबरदस्त वाढ पाहायला मिळेल असे संकेत मिळाले होते. हा शेअर 82 पटींनी सबस्क्राईब झाला होता.

या शेअरच्या IPO साठी 1085-1125 ही रक्कम निश्चित करण्यात आली होती. आयपीओ अंतर्गत शेअर मिळवण्यासाठीची मुदत 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर ठेवण्यात आली होती. फाल्गुनी नायर यांनी ही कंपनी स्थापन केली होती. 2012 साली त्यांनी या कंपनीची सुरुवात केली होती. आयपीओतून 5352 कोटी रुपये जमवण्याचा कंपनीचा निर्धार होता. यातील 130 कोटींची रक्कम ही कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि 200 कोटींची रक्कम ही ब्रँडच्या प्रचार, प्रसारावर खर्च करण्याचा कंपनीचा मानस आहे.