अजब गजब! शवविच्छेदनानंतर प्रेताला जिवंत करण्याचा अघोरी प्रकार

file photo

ओडीशाच्या नयागडमध्ये एक अजब गजब प्रकार समोर आला आहे. शवविच्छेदन केलेल्या प्रेताला तंत्रमंत्राने जिवंत करण्याचा अघोरी प्रकार येथे घडला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आजही अनेक लोकं अंधश्रद्धेने जखडलेले असल्याचे या घटनेने स्पष्ट होते. नयागढ येथील सारांकुल पोलीस स्थानकातील बारासाही गावात हा प्रकार घडला आहे. राबी नाहक असे मृत इसमाचे नाव आहे. त्यांच्या गावात उत्सव सुरू होता. त्यामधील डांडा नाचा अशी प्रथा असून यामध्ये 45 वर्षीय राबीने सहभाग घेतला होता. त्यांच्या प्रथेनुसार यामध्ये छत्तीस तास काही खायचे नसते. त्यानुसार राबीनेही काही खाल्ले नव्हते. मात्र दोन दिवसापूर्वी राबी आजारी पडला. त्याला जिल्हा रुग्णालयाच दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला.

रुग्णालय प्रशासनाच्या नियमानुसार रविवारी शवविच्छेदन करून नातेवाईकांकडे त्याचा मृतदेह सोपवण्यात आला. मृतदेह गावात आणला मात्र त्यावर अंतिम संस्कार झाले नाहीत. तर गावकऱ्यांनी एका बुवाला बोलावलं. त्याने तंत्रमंत्र पुटपुटून मृताच्या आत्म्याला बोलवायला सुरुवात केली त्याच्याबरोबर डोळ्यावर अंधश्रद्धेची पट्टी असलेल्या गावकऱ्यांनी आणि राबीच्या घरच्यांनी देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. अखेर सोमवारी संध्याकाळी त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

याप्रकरणी नयागढ सीडीएमओ डॉ. शक्ति प्रसाद मिश्रा शवविच्छेदन अहवालात राबीला डिहायड्रेशन होऊन त्याला हिट स्ट्रोक आल्यामुळे त्याचा मृत्यू झालाचे स्पष्ट केले होते. याबाबत पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या