मुंबईकर ओजस सुर्वेने जिंकली रेड बुल कार्ट राष्ट्रीय फायनल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हैदराबादमधील शिकेन सर्किट, लिओनिया रिसॉर्ट येथे नुकतीच  रेड बुल कार्ट फाइट 2021 ची रोमहर्षक नॅशनल फायनल प्रेक्षकांना पाहायला मिळाली. अद्वितीय रेसिंग अनुभव आणि अद्वितीय हौशी गो कार्ट स्पर्धा असलेल्या रेड बुल कार्ट फाइटच्या चौथ्या पर्वामध्ये 6 शहरांमधील 800 हून अधिक स्पर्धकांचा  सहभाग दिसून आला.

मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, बडोदा व गुरुग्राम या सहा शहरांमधील अव्वल 3 सहभागींनी  हैदराबादमधील नॅशनल फायनल्समध्ये सहभाग घेतला. मुंबईकर ओजस सुर्वेने सर्वात जलद लॅप टाइमसह इतर प्रतिस्पर्धींना मागे टाकले आणि तो रेड बुल कार्ट फाइट चॅम्पियन ठरला. त्याला अबूधाबी ग्रॅण्ड प्रिक्स येथे एफ 1 2021 सीझन-एंडिंग रेस पाहण्याची संधीदेखील मिळाली आहे. रेड बुल ऍथलिट आणि हिंदुस्थानची यंग रेसिंग सेन्सेशन मीरा एर्डा हैदराबादमधील शिकेन सर्किट येथे रेड बुल कार्ट फाइट नॅशनल फायनल्समध्ये रेसर्सचा उत्साह वाढवताना दिसण्यात आली.