चाकरमान्यांचे विकेण्ड वांदे; लटकलेल्या ओव्हरहेडने तासभर लटकवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । टिटवाळा

कसारा मार्गावर मध्य रेल्वेची रखडपट्टी सुरूच असून ओव्हरहेड वायरने चाकरमान्यांना तासभर लटकवले. टिटवाळा-आंबिवलीदरम्यान बल्याणीलगत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटून लटकल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. एक तासाच्या दुरुस्तीनंतर वाहतूक सुरू करण्यात आली. ही घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे विकेण्ड वांदे झाले. तर सोबत कॉलेज, शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले

टिटवाळा-आंबिवलीदरम्यान  बल्याणीलगत  मध्य रेल्वेच्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाकरील ओव्हरहेड वायर  सकाळी 11.02 वाजेच्या सुमारास  तुटून लटकली. अतिउच्च दाबाच्या ओव्हरहेड वायरच्या संपर्कात चुकून कुणी आल्यास त्याचा कोळसा होतो. त्यामुळे  दुरुस्तीसाठी ओव्हरहेड वायरचा संपूर्ण विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यानंतर रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केली. सुमारे  सुमारे 11.56 च्या  सुमारास दुरुस्ती झाल्याकर रेल्के काहतूक उशिराने सुरू झाली असल्याची माहिती आंबिवली रेल्वे स्थानकाचे प्रमुख अमेय कुमार यांनी दिली. दरम्यान कसारा ते कल्याणपर्यंतची लोकल वाहतूक पूर्णपणे कोलमडली. प्रवाशांना एसटी, बससारख्या पर्यायी वाहतुकीची यावेळी मदत घ्यावी लागली. दरम्यान त्यामुळे दोन लोकल, एक मेल थांबकिण्यात आल्या असल्याने चाकरमानी लोकलमध्ये घामाघुम झाले. याचा सर्वाधिक फटका शाळा व महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. सुदैवाने आज दहावीची परीक्षा नव्हती. अन्यथा दहावीच्या विद्यार्थ्यांनाही ‘लटकंती’चा पेपर सोडवण्याची वेळ ओढावली असती.

रोजचेच रडगाणे

कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर दिवसाआड लोकल वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे मेगा ब्लॉकमध्ये रेल्वे प्रशासन काय काम करते, असा सवाल विचारला जात आहे. कामावर निघालेल्या प्रवाशांना रोज कार्यालयात लेटमार्कला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनेचे रमण तरे यांनी दिली.