चिदंबरम यांच्या घरातून कोट्यवधींचे दागिने चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरातून कोटय़वधी रुपयांचे दागिने, दीड लाखाची रोकड आणि ६ सिल्कच्या साडय़ा चोरीला गेल्याची घटना उघडकीला आली आहे. घरात काम करणाऱ्या दोघी मोलकरणींचा या चोरीत हात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी एक महिने उटीला होत्या. उटीहून परतल्यानंतर घरातील अलमारी उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.