
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना आपल्याच देशाची पोलखोल केली आहे. पाकिस्तानमध्ये जैश-ए-मोहम्मदचे अस्तित्वच नाही असा दावा सैन्याचे प्रवक्ते असिफ गफूर यांनी केले होते. परंतु बुधवारी पाकिस्तानच्या एका पत्रकाराशी बोलताना मुशर्रफ यांनी माझ्या कारकीर्दीमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मदतीने आयएसआयने हिंदुस्थानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले केले होते असे म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तान तोंडावर आदळला आहे.
पाकिस्तानमध्ये जैश-ए-मोहम्मदचे अस्तित्वच नाही, पाकड्यांचा अजब दावा
बुधवारी परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिकशी बोलताना जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तानचे संबंध उघड केले. तसेच जैश-ए-मोहम्मदवर केलेल्या कारवाईचेही त्यांनी स्वागत केले. मुशर्रफ म्हणाले की, जैशने 2003 मध्ये माझ्या हत्येचा कट रचला होता. परंतु ते यात यशस्वी झाले नाहीत. तसेच जैशने आपल्यावर दोनदा हल्ल्याचा प्रयत्न केल्याचेही मुशर्रफ यांनी सांगितले.

तुमच्या कारकीर्दीमध्ये जैश-ए-मोहम्मदवर कारवाई का करण्यात आली नाही असे मुशर्रफ यांना विचारण्यात आले. याला उत्तर देताना मुशर्रफ म्हणाले की, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्या दरम्यान हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील परिस्थिती खराब होती. तसेच पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने हिंदुस्थानवरील हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मदची मदत घेतल्याचेही ते म्हणाले.
याआधी जैश-ए-मोहम्मद या दहदशतवादी संघटनेने हिंदुस्थानात पुलवामामध्ये लष्कराच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला होता. यात हिंदुस्थानचे 40 जवान शहीद झाले होते. यानंतर हिंदुस्थानने जोरदार कारवाई करत एअर स्ट्राईक केला आणि पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हवाई हल्ला केला. यात जैशचे अनेक कमांडर ठार झाले.

याआधी ‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीच्या एका मुलाखातीत गफूर म्हणाले की, “जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे पाकिस्तानमध्ये कुठलेच अस्तित्व नाही. मसू अझहर पाकिस्तानमध्येच आहे. माझ्या माहितीनुसार तो खूप आजारी असून घराबाहेरही पडू शकत नाही.”




























































