
पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात 28 जण ठार झाले आहेत. तर 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे मशिदीची एक भिंतही कोसळली आहे. सोशल मीडियावर या स्फोटानंतरचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. स्थानिक लोक जखमींना गाडीतून रुग्णालयात दाखल करायचा प्रयत्न करत आहेत. हा स्फोट पेशावर पोलीस लाईनच्या मशिदीत झाला आहे.




























































