
हिंदुस्थानसोबत झालेल्या युद्धातून आम्ही धडा शिकलोय, आता आम्हाला युद्ध नकोय अशी विधाने करणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधांनांनी अचानक पलटी मारली आहे. आम्ही अण्वस्त्र सज्ज देश असून आमच्याकडे हिंदुस्थान वाकड्या नजरेने पाहू शकत नाही अशा फुसकुल्या शरीफ यांनी सोडल्या आहेत. पाकिस्तानात मोठं आर्थिक संकट आहेत, तिथल्या जनतेचे खायचे-प्यायचे वांदे झाले आहेत. तिथली परिस्थिती सुधारण्याऐवजी पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी अशा हास्यास्पद वल्गना करणं सुरूच ठेवलं आहे. शरीफ यांनी पाकव्याप्त कश्मीरमध्ये बोलत असताना म्हटले की, पाकिस्तान एक अण्वस्त्रसज्ज असा देश आहे. हिंदुस्थान आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. जर असे झाले तर टाचेखाली हिंदुस्थानला चिरडून टाकण्याची आमच्यात क्षमता आहे.