पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला झुंजवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 187 अशा दमदार धावसंख्येनंतरही पाकिस्तानी गोलंदाजांनी ‘बॉक्सिंग डे’ कसोटी रंगत आणली आणि यजमानांचा डाव आधी 318 धावांवर संपवला. त्यानंतर अब्दुल्ला शफिक आणि कर्णधार शान मसुदने वैयक्तिक अर्धशतके झळकावत 90 धावांची भागी रचत ऑस्ट्रेलियाला तोडीस तोड उत्तर दिले. पण शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा अर्धा संघ बाद करत दिवसअखेर 6 बाद 194 अशी स्थिती केली.

मंगळवारच्या 3 बाद 187 नंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडून जोरदार खेळाची अपेक्षा होती, पण त्यांचे फलंदाज धडाधड बाद होते गेले. लाबुशन (63) आणि हेड (17) ही जोडी दिवसाच्या प्रारंभीच फुटली. मग लाबुशन आणि मिचेल मार्शने 46 धावांची भागी रचली. पण आमीर जमालने ही जोडी पह्डली आणि त्यानंतर दहा-दहा धावांच्या अंतराने पाकिस्तानी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाला हादरे देत त्यांचा डाव 318 धावांवर संपवला.

शफिक-मसूदचा दमदार खेळ
इमामुल हक (10) खेळपट्टीवर फार टिकला नाही. मात्र त्यानंतर अब्दुल्ला शफिक आणि शान मसूदने पाकिस्तानी डावाला स्फूर्ती देणारी भागी रचली. दोघांनी 90 धावांची भागी रचताना वैयक्तिक अर्धशतकेही साजरी केली, पण ही जोडी फुटल्यानंतर पाकिस्तानी डावाला नजर लागली. पॅट कमिन्सने शफिकला बाद केल्यानंतर बाबर आझमचा (1) त्रिफळा उडवत पाकिस्तानच्या पोटात गोळा आणला.