कोरोनाबाधितासोबत सेल्फी; सहा अधिकारी निलंबित

384

जगात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून कोरोनाची बाधा झाल्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक चिंतेत आहेत. पाकिस्तानमध्येही कोरोनाचा संसर्ग फैलावत असून एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. कोरोनाबाधितासोबत सेल्फी काढल्याप्रकरणी सहा अधिकाऱ्याना निलंबित करण्यात आले आहे.

पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, खैरपूर जिल्ह्याच्यामाध्यमांकडे सोपवले. उपायुक्तांनी वेगवेगळ्या भागातील सहा महसुली अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. या अधिकाऱ्यानी ज्या अधिकाऱ्यांसोबत सेल्फी काढला, त्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे वैद्यकीय चाचणीत समोर आले आहे. हा कोरोनाबाधित अधिकारी नुकताच इराणहून तीर्थयात्रेवरून परतला होता. जेव्हा सेल्फी घेण्यात आला तेव्हा या अधिकाऱ्यांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळली नव्हती अथवा त्यानेदेखील काही त्रास होतोय याबाबत काही भाष्य केले नव्हते. हा सेल्फी चांगल्या भावनेतून घेण्यात आला होता. मात्र, हा सेल्फी कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केला. यानंतर काही दिवसांनी या अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. कोरोनाबाधित अधिकाऱ्यासोबत सेल्फी काढणाऱ्या अधिकाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग शेजारच्या पाकिस्तानमध्ये पसरत आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 750 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तर पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन करता येणार नसल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले. पाकिस्तानमध्ये 20 टक्क्यांपेक्षा लोक दारिद्र्यरेषेखालील आहेत. त्यांना याचा मोठा त्रास होऊ शकतो. मात्र, लोकांनी स्वत:हून घरात थांबण्याचे आवाहन खान यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या