पालघरमध्ये पोलिसांची दिल्लीसारखी दडपशाही; वाढवण बंदराच्या ग्रीनफिल्ड मार्गाविरोधातील आंदोलनकर्त्यांना फरफटत नेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेवर धडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांवर निर्दयीपणे लाठीचार्ज व अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डणाऱया पेंद्राप्रमाणेच राज्य सरकारने आज पालघरमध्येही तशीच दडपशाही केली. वाढवण बंदराच्या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भरावाचे काम सुरू असल्याचे समजताच शेकडो आंदोलकांनी डहाणूच्या वरोर नाक्यावर धडक देत जोरदार आंदोलन केले. संतप्त आंदोलकांनी डहाणू-चिंचणी  बोईसर कोस्टल मार्गावर चार तास रास्ता रोको करत वाहतूक रोखून धरली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्या गावकऱयांना अक्षरशः फरफटत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये कोंबले. सरकारच्या या झुंडशाहीविरोधात संपूर्ण पालघर जिह्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महिला आंदोलक अत्यवस्थ

रस्त्यावर ठिय्या देऊन बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी जबरदस्तीने हटवून पोलीस वाहनांमध्ये काsंबल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सत्यवान ठापूर यांनी सांगितले. या कारवाईदरम्यान एका महिला आंदोलकाची प्रपृती बिघडल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना बिनशर्तपणे तत्काळ सोडण्यात यावे व सरकारची ही दडपशाही अशीच सुरू राहिल्यास भविष्यात अधिक व्यापक आंदोलन केले जाईल, असा इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे विनित पाटील, मिलिंद राऊत तसेच अन्य पदाधिकाऱयांनी दिला आहे.

‘वाढवण बंदरासाठी प्रस्तावित अॅक्सेस रोडचे काम सुरू असताना काही संघटनांनी विरोध करून डहाणू–चिंचणी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे चार तास वाहतूक बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे रस्ता तातडीने खुला करण्यासाठी काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.’

यतीश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर

प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱया ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भरावासाठी 12 डंपर भरून दगड-माती आणली जात होती. हा सर्व प्रकार समजताच स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, मच्छीमार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी डहाणू तालुक्यातील वरोर नाका येथे दाखल झाले.

प्रशासकीय अधिकाऱयांना जाब विचारत गावकऱयांनी डहाणू-चिंचणी-बोईसर कोस्टल मार्गावर रस्ता अडवून ठेवला.

पोलीस अधीक्षक यतीन देशमुख, उपअधीक्षक विनायक नरनाळे यांनी आंदोलकांना अक्षरशः फरफटत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये डांबले.

आंदोलकांना डहाणू तसेच बोईसर येथील पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत कुणाचीही सुटका करण्यात आली नाही.