वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, निफाड

चेहडी येथे नाशिक-संभाजीनगर महामार्गावर बिबटय़ा रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाला. वन विभागाला कळवल्यानंतर घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दाखल होत बिबटय़ाचे शव ताब्यात घेतले.

तत्पूर्वी घटनास्थळी मृत बिबटय़ा बघण्यासाठी रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सध्या गोदाकाठमधील सर्वच गावांत बिबटय़ाची दहशत असून महामार्गावरदेखील आता बिबटे दिसू लागल्याने महामार्गावरून येणारे-जाणारे दुचाकीस्वारदेखील भयभीत झाले आहेत.

summary- panther died in hit by car