21 डिसेंबरला ‘पाटील’ येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘पाटील’ चित्रपटाच्या रुपात एका प्रेरणादायी संघर्षकथेने प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यातला बहुतांश भागात चित्रपट प्रदर्शित झाला तर काही ठिकाणी होऊ शकला नाही. प्रेक्षक आग्रहास्तव ‘पाटील’ येत्या 21 डिसेंबरला पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., साचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. निर्मित पाटील संघष… ‘प्रेम आणि अस्तित्वाचा’ या चित्रपटात शिवाजी पाटील याचा संघर्षमय प्रवास मांडला आहे.  संतोष राममीना मिजगर लिखित-दिग्दर्शित, पाटील चित्रपटात एस.आर.एम एलियन, शिवाजी लोटन, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, यश आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. वोशेष भूमिकेत डॉ. जगदिश पाटील (कोकण आयुक्त) आणि पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत ‘झी नेटवर्क एस्सेलव्हीजनचे चेअरमन डॉ. सुभाषचंद्रा दिसणार आहेत.