नितीश कुमार यांनी दिला बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजभवनात जात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता, जवळपास दोन दशकांनंतर, भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे देशात बिहारच्या राजकारणाची चर्चा सुरू होती. आता नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आता भाजपकडून कोण मुख्यमंत्री होणार, याबाबत चर्चा होत आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार यांनी राजभवनात आपला राजीनामा सादर केला आहे. जवळपास दोन दशकांनंतर बिहारमध्ये आता भाजपकडून बिहारला मुख्यमंत्री देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली २१ वर्षे बिहारचे राजकारण नितीश कुमार यांच्याभोवती फिरत राहिले आहे. या काळात ते १० वेळा मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सहा राजकीय दलबदल केले.