
सामना ऑनलाईन । रायपूर
जे नेते एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत ते शहीद जवानांचा अपमान करत असल्याची टीका भाजपध्यक्ष अमित शहा यांनी केली. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये एका रॅलीत ते बोलत होते. तसेच देशाची सुरक्षा ही भाजपची केवळ घोषणा नसून ते ध्येय असल्याचे शहा यांनी म्हटले. नरेंद्र मोदींनी त्यासाठी दोनदा धडक कारवाई केल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
शहा म्हणाले की, “शत्रूविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सैन्याला पूर्ण मोकळीक दिली आहे. आपले सैन्य शत्रूंना चांगलेच प्रत्युत्तर देत आहे. जे एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत ते शहीद जवानांचा अपमान करत आहेत. त्याचे उत्तर जनता आगामी लोकसभेत त्यांना देईलच.” भाजप हा इतर पक्षांसारखा नसल्याचे शाह यांनी म्हटले.
जहाँ एक तरफ़ पूरी सेना और देश में गौरव का माहौल है वही राहुल गाँधी पाकिस्तान में आतंकवादियों के ऊपर एयर स्ट्राइक के सबूत मांगकर सेना के शौर्य पर ऊँगली उठा रहें हैं।
मैं राहुल गाँधी को कहना चाहता हूँ कि फर्जीपना कांग्रेस का संस्कार है, भारतीय जनता पार्टी की संस्कृति नहीं। pic.twitter.com/Rmd53McKox
— Amit Shah (@AmitShah) March 7, 2019
हवाई दलाने या कारवाईला दुजोरा दिला असताना काँग्रेस अध्यक्षांनी याचे पुरावे मागणे चुकीचे असल्याचे शाह यांनी म्हटले. त्यांनी सैन्यावर विश्वास ठेवायला पाहिजे असेही शाह यांनी म्हटले. तर आपल्यावर हल्ला झाल्यावर बदल घेण्याची अमेरिका आणि इस्रायल या दोन देशाची ओळख होती. परंतु सर्जिकल स्ट्राई आणि एअर स्ट्राईक नंतर पंतप्रधान मोंदींनी आता हिंदुस्थानचाही या बदला घेणार्या देशांमध्ये समावेश केला आहे.”
देश की सुरक्षा हमारे लिए सिर्फ़ एक नारा नहीं, हमारा प्रण है।
प्रधानमंत्री मोदी जी की दृढ़ राजनीतिक इच्छाशक्ति और सेना के शौर्य ने दो बार, पहले सर्जिकल स्ट्राइक और अब एयर स्ट्राइक करके यह दिखा दिया है कि हिन्दुस्तान की सुरक्षा से छेड़खानी का अंजाम क्या होता है? pic.twitter.com/JNcnkG8sZB
— Amit Shah (@AmitShah) March 7, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानी हवाई दलाने पाकव्याप्त कश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मदचे तळ उध्वस्त केले होते. यावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काही दिवसानंतर हवाई दलाने या कारवईला दुजोरा दिला होता.


























































