बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करा; सुप्रीम कोर्टात याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी कामकाजात अडथळा आणल्याने प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याबाबतचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. नाशिक महापालिका आयुक्तांनी दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही असा आरोप करत बच्चू कडू यांनी 2017 मध्ये आंदोलन केले होते. तेव्हा कडू यांचा मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी वाद झाला होता.