गाईला राष्ट्रीय प्राणी जाहीर करण्याची याचिका फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाईला राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करा, अशी मागणी करणारी गोवंश सेवा सदन या स्वयंसेवी संस्थेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. अशाप्रकारे राष्ट्रीय प्राणी जाहीर करणे हे आमचे काम नाही. ही याचिका करण्यामागे तुमचा कोणता अधिकार डावलला जात होता, याची विचारणा देखील कोर्टाने संस्थेला केली आहे. न्यायमूर्ती एस. के. कौल आणि अभय ओक यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.