
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेचा सक्रिय सदस्य असलेल्या शेख उमेर शेख हबीब (30) याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. जालना येथे ही कारवाई करण्यात आली.
पीएफआय या संघटनेच्या सदस्यांनी बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी एटीएसने चार गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर या गुह्यात राज्यातील विविध ठिकाणांहून 21 जणांना अटक करण्यात आली होती. या गुह्यांच्या तपासादरम्यान शेख उमेर शेख हबीब याच्या विरोधात सबळ पुरावे हाती आल्यानंतर एटीएसने सोमवारी जालन्यातून त्याला पकडले. त्याला आज संभाजीनगर येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर केले असता त्याला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.





























































