जांभूळ किंवा गुळवेलीची पाने वाटून खाल्याने मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होईल.
मेथीमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. कमीत कमी 50 ग्रॅम मेथीचा उपयोग करावा.
एक चमचा आवळ्याच्या रसात कारल्याचा रस मिसळून रोज घेतल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
कारल्याच्या रसात केरोटिन नावाचं रसायन असतं. या रसात पाणी घालून दिवसातून किमान तीन वेळा घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
मधुमेह असणाऱ्यांनी मध खाऊ नये असा गैरसमज आहे. मधात कार्बोहायड्रेट, कॅलरी आणि अनेक प्रकारची मायक्रो न्यूट्रियंट्स असतात. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी स्थिर राहते.