
जगभरात कोरोना व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. चीनच्या वुहान मधून पसरलेला हा व्हायरस हिंदुस्थानमध्येही पसरला आहे. देशातील रुग्णांची संख्या 300 पार गेली आहे. त्यामुळे भीतीदायक वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधी केलेल्या आवाहनाला जनतेने चांगला प्रतिसाद देत 22 मार्च रोजी जनता कर्फ्यु पाळला. मात्र त्यानंतर काही ठिकाणी परत सरकारी नियम लोक पाळत नसल्याचे समोर आले. यानंतर कोरोनाबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आज मंगळवारी रात्री 8 वाजता पुन्हा संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून एक ट्विट करण्यात आले. पंतप्रधान मोदी मंगळवारी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करतील, असे या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
वैश्विक महामारी कोरोना वायरस के बढ़ते प्रकोप के संबंध में कुछ महत्वपूर्ण बातें देशवासियों के साथ साझा करूंगा। आज, 24 मार्च रात 8 बजे देश को संबोधित करूंगा।
Will address the nation at 8 PM today, 24th March 2020, on vital aspects relating to the menace of COVID-19.
— Narendra Modi (@narendramodi) March 24, 2020
कोरोनाचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या आहेत, पुढे काय काळजी घ्यायची आहे याबाबत मोदी माहिती देण्याची शक्यता आहे.


























































