
हिंदुस्थानी वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये करीअर, नोकरी करण्यासाठी हिंदुस्थानी तरुण-तरुणींना गिफ्ट देण्यात आले आहे. दरवर्षी हिंदुस्थानसाठी 3000 व्हिसा जारी करेल, अशी घोषणा केली आहे.
इंडोनेशियातील बाली येथे आयोजित जी-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान ऋषी सुनक यांची पहिल्यांदा भेट झाली. दोन्ही देशांमध्ये व्यापार, उद्योग वाढविण्याबरोबरच आणखी संबंध दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
– 3000 जणांना व्हिसा जारी करण्यात येईल. ब्रिटनमध्ये दोन वर्षे रहा, काम करा, आपले करीअर करा अशी ही योजना आहे.




























































