
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
उरण पोलिसांनी गावठी दारू विरोधात आपली मोहीम आणखी तीव्र केली असून गावठी दारू बनविण्यासाठी लागणारा काळा गुळ विकणाऱ्याला मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून १२ हजार रूपये किंमतीचा ३५० किलो काळा गुळ जप्त केला आहे.
प्रितम चंदने (३६) असे आरोपीचे नाव आहे. करंजा आग्रीपाडा येथे तो दारूसाठी लागणारा काळा गुळ विकत असे. त्याच्या घरातून हा गुळाचा साठा जप्त केला आहे. करंजा गावात विविध ठिकाणी लागणाऱ्या हातभट्ट्यांना येथून काळा गुळ विकला जात असे. करंजा परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या हातभट्ट्यांचे व्यवसाय सुरू आहेत. येथूनच उरण शहर तसेच आजुबाजुच्या परिसरात व झोपडपट्टीत दारू पुरविली जाते. उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश तांबे व जी.व्ही कराड यांनी ही कारवाई केली. करंजा आणि उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले गावठी दारूचे अड्डे संपूर्णपणे बंद करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.




























































