पूनम पांडेचा युटर्न, मारहाणीचा आरोपानंतर पुन्हा नवऱ्याकडे परतली

वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेने काही दिवसांपूर्वी तिचा नवरा सॅम विरोधात पोलिसांत विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानंतर तिच्या पतीला अटकही झाली होती. या प्रकरणानंतरर तिने ती लग्न मोडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता या प्रकरणात पूनम पांडेने युटर्न घेतला असून तिने नवऱ्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. पूनमने इंस्टाग्रावर तिच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे.

‘आम्ही आमच्यातले मतभेद दूर करण्याचे प्रयत्न करत आहोत. आम्ही पुन्हा एकत्र आलोय. तुम्हाला माहित आहे का? आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही वेड्यासारखे एकमेकांवर प्रेम करतो. तुम्ही मला सांगा कोणत्या लग्नात कुरबुरी नसतात’, असे पुनमने एका मुलाखतीत सांगितले आहे. सॅने देखील त्यांच्यातील भांडण मिटले असल्याचे सांगितले आहे.

पूनम एका चित्रीकरणासाठी दक्षिण गोव्यातील काणकोण येथे आली होती. तिच्या सोबत तिचा पती सॅम बॉम्बे देखील आला होता. पूनमने 22 सप्टेंबर रोजी काणकोण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवताना पती सॅमने आपला विनयभंग केला असून आपणास मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्या नंतर काणकोण पोलिसांनी पूनमची वैद्यकीय चाचणी करून पती सॅमला अटक केलेली. पूनमने प्रियकर सॅमसोबत 11 सप्टेंबरला गुपचूप विवाह उरकला होता. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या लग्नाची माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या