
पवई येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यान आणि प्रमोद महाजन वन उद्यानाचा लवकरच कायापालट होणार आहे. दोन्ही उद्यानांच्या विकासासाठी पालिकेने 5 कोटी 65 लाख रुपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. हा प्रस्ताव स्थायी समिती आणि स्थापत्य समिती (उपनगरे) समोर येणार आहे.
अटलबिहारी वाजपेयी उद्यानातील तुटलेल्या संरक्षक भिंती, फुटपाथ, प्रवेशद्वार तसेच गजेबो, बैठक व्यवस्था तसेच शौचालय- कंप रूमची दुरुस्ती करणे, लहान मुलांची खेळाची व व्यायामाची उपकरणे, रंगरंगोटी, विद्युतीकरण तसेच हिरवळीची कामे केली जाणार आहेत. प्रमोद महाजन वन उद्यानातही विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. उद्यानातील संरक्षक भिंत पदपथ, मुख्य प्रवेशद्वार तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.






























































