दंड भरला म्हणजे मी गुन्हा कबूल केला असे नाही! प्रशांत भूषण यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाने अवमानना खटल्यात ठोठावलेला 1 रुपयाचा दंड मी न्यायालयाचा मान राखण्यासाठी भरतोय. त्याचा अर्थ मी माझा गुन्हा कबूल केला असे होत नाही. मला झालेल्या शिक्षेविरोधात मी पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे,अशी प्रतिक्रिया जेष्ठ कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांनी न्यायालय रजिस्ट्रार कार्यालयात ड्राफ्टने दंड भरल्यानंतर दिली.

देशात सरकारच्या जुलमाविरोधात आवाज उठवणाऱ्या उमर खालिद आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. सरकारविरोधात बोलणे हा गुन्हा ठरत असेल तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडण्याचा प्रकारच म्हणायला हवा, अशी भूमिका ऍडक्होकेट प्रशांत भूषण यांनी व्यक्त केली.

अन्यायग्रस्तांसाठी सच्चाई निधी उभारणार

मला अवमान खटल्यात न्यायालयाने 1 रुपया दंड ठोठावला हे समजताच माझ्यावर देशभरातून निधीचा वर्षाक होत आहे, असे सांगून भूषण म्हणाले, मी आता जमणाऱ्या पैशातून सरकारविरोधात बोलणाऱ्या ज्या नागरिकांवर दडपशाहीने अन्याय करण्यात आलाय त्यांच्या कायदेशीर मदतीसाठी ‘सच्चाई निधी ’ उभारणार आहे. देशातील अनेक संघटना आणि व्यक्तींनी मला 1 रुपया निधी देऊ केला आहे. या जनतेच्या पैशातूनच मी हा निधी उभा करणार आहे.