वयाच्या 46व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, जुळ्या मुलांना दिला जन्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ म्हणजेच प्रीति झिंटाने आपल्या चाहत्याना एक आनंदाची बातमी दिली आहे. वयाच्या 46 व्य वर्षी ही अभिनेत्री जुळ्या मुलांची आई झाली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिने ही बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या जुळ्या मुलांची नावे देखील सांगितली आहेत. तिच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रितीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘‘मी तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छिते. मी आणि माझा पती जीन खूप आनंदी आहे. आमच्या घरी जुळ्या बाळांचे आगमन झाले आहे. त्या दोघांची नावे जय आणि जिया अशी आहेत’’

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

दरम्यान, अभिनेत्री प्रीति झिंटाने तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केले होते. फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजलसमध्ये अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला होता. लग्नाच्या जवळपास पाच वर्षांनंतर प्रीति आई झाली आहे. प्रितीने शेअर केलेल्या पोस्टवर जगभरातील चाहते या जोडप्याला मुलांच्या जन्माबद्दल शुभेच्छा देत आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.