डीप फेकविरोधात प्रीती झिंटा हायकोर्टात; आक्षेपार्ह सामग्री हटविण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावरून एआय-निर्मित डीप फेक फोटो आणि मॉर्फ केलेला मजकूर हटवण्यात यावा, अशी मागणी करत अभिनेत्री प्रीती झिंटा हिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने या याचिकेची शुक्रवारी दखल घेत आक्षेपार्ह सामग्री हटविण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे आदेश ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह सर्व पक्षकारांना दिले आहेत. एआयच्या साहाय्याने तयार करण्यात आलेले डीप फेक व्हिडीओ, मॉर्फ्ड छायाचित्रे आणि त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेले चॅटबॉट-शैलीतील संवाद व अन्य सामग्री त्यांच्या परवानगीशिवाय तयार करून विविध सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आल्याचा दावा प्रीती झिंटा यांनी केला आहे. संबंधित संकेतस्थळांना अशी सर्व सामग्री तातडीने हटविण्याचे आदेश द्यावेत तसेच भविष्यात त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्याशी संबंधित कोणतीही एआय-निर्मित किंवा मॉर्फ्ड सामग्री प्रसिद्ध करण्यास कायमस्वरूपी मनाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.