
नोयडा फेज 2 येथील औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या मागणीच्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागलं. मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचारी संतापले व त्यांनी कारखान्यांमध्ये दगडफेक आणि तोडफोड केली. त्यानंतर अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हे आंदोलन शांत झाले असे वाटत असतानाच मंगळवारी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी तिथे आलेल्या पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक देखील केली.
#WATCH | Uttar Pradesh: After a violent protest yesterday over demands for a salary increment, protestors have gathered and pelted stones in Phase 2 of Noida today.
Police deployment has been made here to bring the situation under control. Protestors are being dispersed from the… pic.twitter.com/18u0DD3LzS
— ANI (@ANI) April 14, 2026
नोयडाच्या सेक्टर 121 मधील गढी चौखंडी गावात ही घटना घडली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आंदोलकांना हुसकावून लावले असून आता त्या ठिकाणी शांतता आहे. मात्र पुन्हा काही घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
कागदोपत्री पगार 25 हजार, देतात 15 हजार
नोएडामध्ये कर्मचारी आंदोलन केवळ पगारवाढ व इतर मागण्यांपुरते मर्यादित नव्हते. त्यास कर्मचाऱ्यांच्या शोषणाचीही किनार होती. या कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर तरुण आंदोलकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अनेक वर्षे झाली तरीही पगारवाढ होत नाही. फार आवाज उठवला तर 200-300 रुपये वाढ केली जाते. 12-12 तास काम करून घेतात. कागदोपत्री 25 हजार पगार दाखवण्यात येतो मात्र हातात 15 हजार रुपयेच पगार मिळतो. सुरक्षा व इतर सुविधा नाहीत.























































