दुग्ध व्यावसायिकाला चॉपरच्या धाकाने 10 हजार रूपयांची मागणी करणाऱ्याला लष्कर पोलिसांनी अटक केले. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री पावणेबाराच्या सुमारास कॅम्पमधील आहेर डेअरीत घडली. सुरज संजय खत्री (वय 23, रा. गाडीतळ ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुनमभाई पटनी (वय 57 ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पमध्ये पुनमभाई यांची दुध डेअरी आहे. दोन दिवसांपुर्वी ते मध्यरात्रीच्या सुमारास डेअरीमध्ये झोपलेले होते. त्यावेळी सुरजने त्यांना चॉपरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत 10 हजारांची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक तपास करीत आहेत.






























































