
पुण्यातील सहकारनगरमधील दुकानदारावर वार करून आणि दत्तवाडीतील पेपर विक्रेत्याला मारहाण करीत रोकड लुटणाऱ्या मामा-भाचे टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित टोळीविरूद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत.
गौरव लाल्या सुहास फडणीस (वय 30 रा.पर्वती दर्शन), अक्षय कैलास गरूड (वय 20, रा. अपर इंदिरानगर), सचिन उर्फ घाऱ्या पांडुरंग सोंडकर (वय 31, इंदिरानगर, बिबबेवाडी), महादेव सुरेश नंदुरे (वय 20 रा. कात्रज), चिराग संजय देशमुख अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आरोपींनी सहकारनगर परिसरात असलेल्या एका देशी दारू विक्री दुकानाच्या मॅनेजरवर पालघनने वार करून गल्ल्यातील 57 हजारांची रोकड चोरून नेली होती. त्यानंतर दुसNया दिवशी आरोपींनी स्वारगेट परिसरातील पुलाखाली पेपर विक्रेत्याला मारहाण करून त्यांच्याकडील जमा झालेले 90 हजारांची रोकड हिसकावून नेली होती. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांनी आरोपी गौरव फडणवीस आणि अक्षय गरूड यांना अटक केली. चौकशीत त्यांनी 9 साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली होती.
अधिक चौकशीत आरोपी ऋषीकेश उर्पâ हुक्या श्रीकांत गाडे रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी याने संघटित टोळी केल्याचे उघडकीस आले. त्याच्या साथीदारांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. टोळीविरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्र बाळगून दहशत माजविणे असे एकत्रित 9 गुन्हे केल्याची नोंद आहे. त्याशिवाय स्वंतत्रपणे 57 असे मिळून 66 गुन्हे केल्याचे दिसून आले आहे. टोळीप्रमुख गाडे आणि साथीदारांविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.





























































